केतन अग्रवाल प्रकरणात मोठा निर्णय; ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

पुणे : केतन अग्रवाल दुर्दैवी हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील मागणीला तत्काळ संमती दिली आहे.
केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा प्रभावीपणे पाठपुरावा व्हावा आणि न्यायालयीन प्रक्रिया सक्षमपणे पार पडावी, यासाठी ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली. विशाल अग्रवाल यांनी केलेल्या या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेतली. त्यानंतर या प्रकरणात उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास मुख्यमंत्री यांनी संमती दिली.या निर्णयामुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेला आता नवे वळण मिळणार आहे. सरकारकडून विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकरणाच्या सुनावणीकडे आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…