पुणे , राजन शेळके(प्रतिनिधी) : २८ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवांतर्गत आयोजित ‘पारंपरिक नववधू मेकअप स्पर्धा’ श्री लक्ष्मीमाता मंदिर, शिवदर्शन मुक्तांगण शाळेजवळ, पुणे येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत पारंपरिक नववधूचा साज, शृंगार आणि सौंदर्य यांना महत्त्व देण्यात आले. पारंपरिक मेकअप कलेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि विवाहपरंपरेचे सौंदर्य जपण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून करण्यात आला. या स्पर्धेत संतोष भाटी यांनी प्रथम क्रमांक, अनिता रंधवे यांनी द्वितीय क्रमांक, तर संध्या योगेश पांगारे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. २८ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.


