राष्ट्रउभारणीसाठी ‘पंचपरिवर्तन’ काळाची गरज : नितीन शिंदे

मांजरी बुद्रुकमध्ये विजयादशमी उत्सव, शस्त्रपूजन व पथसंचलन सोहळा संपन्न

पुणे ,आशिष औंढेकर (प्रमुख पश्चिम महाराष्ट्र): आगामी काळात समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ‘पंचपरिवर्तन’ हे प्रमुख साधन ठरेल, असे प्रतिपादन संघ कार्यकर्ते नितीन सुखदेव शिंदे यांनी केले. मांजरी बुद्रुक येथे आयोजित विजयादशमी उत्सव, शस्त्रपूजन व पथसंचलन सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी नितीन शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०१ वर्षांच्या ध्येयप्रवासाचा आढावा घेतला. संघाचे कार्य केवळ शाखेपुरते मर्यादित नसून, समाजाप्रती जबाबदार नागरिक घडवणे आणि सज्जनशक्तीला एकत्र आणून राष्ट्रविकासासाठी सज्ज करणे हे आहे, असे त्यांनी सांगितले. शताब्दी वर्षात समाजाची सकारात्मक पुनर्रचना घडवण्यासाठी सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, नागरी शिष्टाचार, पर्यावरण संरक्षण आणि स्वबोध जागरण या पाच आघाड्यांवर म्हणजेच ‘पंचपरिवर्तन’च्या माध्यमातून समाजातील सज्जनशक्तीने एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. युद्धाच्या प्रसंगी किंवा संकटाच्या काळात केवळ शस्त्रे नव्हे, तर मनगटातील ताकद आणि त्यामागील मनोबल विजय मिळवून देते. दैनंदिन शाखेतील संस्कारांमधून मन आणि विचार समृद्ध करण्याचे काम संघ गेल्या १०१ वर्षांपासून करत आहे, असे शिंदे म्हणाले.

स्वातंत्र्यलढ्यात डॉ. हेडगेवार स्वतः तुरुंगात गेले होते. केवळ सत्तांतर किंवा इंग्रज सरकारचे जाणे पुरेसे नसून, शाश्वत राष्ट्रउभारणीसाठी मनुष्यनिर्माण आणि वैचारिक परिवर्तन आवश्यक आहे. याच विचारातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली, असेही त्यांनी स्पष्ट केले. रामजन्मभूमी आंदोलनाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, साडेचारशे वर्षांचा ऐतिहासिक कलंक पुसून रामजन्मभूमीचा लढा संविधान आणि न्यायालयाच्या मार्गाने सत्याच्या आधारे जिंकला गेला. या कार्यक्रमात स्वयंसेवकांनी लाठी-दंड प्रात्यक्षिके, पथसंचलन, घोषवादनाचे विविध प्रकार आणि सामूहिक कवायती सादर केल्या. विचारांमधील स्पष्टता आणि कृतीतील शिस्त यांचे उत्तम उदाहरण स्वयंसेवकांनी या प्रात्यक्षिकांतून दाखवून दिले.कार्यक्रमाची सुरुवात पुरुषोत्तम गायकवाड यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी उत्सवाची पार्श्वभूमी आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून हभप अनिल (तात्या) घुले उपस्थित होते. त्यांनी स्वयंसेवकांच्या शिस्तीचे कौतुक करत विजयादशमी आणि सीमोल्लंघनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी नगरसेविका सारिकाताई घुले यांच्यासह मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…