काँग्रेसच्या ‘मत वाचवा, देश वाचवा’ जनसंपर्क अभियानाचा सिडकोतून शुभारंभ

नांदेड (प्रतिनिधी) : निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार जनतेसमोर आणण्यासाठी खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या ‘मत वाचवा, देश वाचवा’ या व्यापक जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ सोमवारी (ता. १९) हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सहप्रभारी रेहना चिश्ती यांच्या हस्ते, तसेच डॉ. स्मिता शहापूरे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि महानगर जिल्हाध्यक्ष अब्दुल गफ्फार यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकार आणि एसआयआर मोहिमेतील त्रुटींविरोधात काँग्रेसकडून राष्ट्रीय विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीपासून गल्लीपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार जनतेसमोर आणण्यासाठी ‘मत वाचवा, देश वाचवा’ या जनसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी अभियानाच्या माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. तसेच व्यापारी वर्गामध्ये माहितीपत्रकांचे वाटप करून अभियानाची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाला डॉ. यशपाल भिंगे, माजी महापौर अब्दुल सत्तार, सुरेंद्र घोडजकर, डॉ. रेखाताई चव्हाण, धनराज राठोड, आनंद चव्हाण, आनंदराव गुंडिले, अनिल मोरे, मुन्ना अब्बास, सत्यपाल सावंत, महेश देशमुख तरोडेकर, आयोजक तथा सिडको ब्लॉक अध्यक्ष बापूसाहेब पाटील, ज्योती कदम, दीपसिंग हुजुरिया, रमेश चित्ते, अब्दुल रहिम, गगन यादव, ललिता कुभांर, गोविंद बाबा गोंड, आनंदराव कल्याणकर, जसपालसिंग तबेलेवाले, अजिज कुरेशी, सुरेश हाटकर, सचिन टाले, डॉ. बाकी, राजू पाटील, विनोद कांचनगिरे, शंकर शिंदे, जेशिका शिंदे, सुरेखा वैद्य, शामराव पाटील, आंबादास रातोळे, फहिम अब्दुल, सुनील पवार, गोविंद पाटील, शिवशुंभू स्वामी, संजय वाघमारे, संजय कौठेकर, देविदास कदम, संजय कदम, प्रल्हाद गव्हाणे, डॉ. अशोक कलंत्री, प्रसेनजित वाघमारे, धनंजय उमरीकर, नुरोद्दीन शेख, लतिफ शेख, गोपीनाथ कहाळेकर, माणिक श्रोते, किशन रावनगावकर, नईम शेख, सचिन कानोडे, सोपानराव पांडे, अझहर शेख, जाफर शेख, असलम शेख, अजय गालेवाड, प्रभू उरूदवाड, भगवान जोंगदंड, शादूल पठाण आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…