हनीलिसा अपार्टमेंट परिसरातील बेकायदेशीर गोशाळा, गोदामांच्या लोडिंग-अनलोडिंगच्या आवाजामुळे रहिवासी त्रस्त

नागपूर,सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : लकडगंज येथील हनीलिसा अपार्टमेंट परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोशाळा, अस्वच्छता तसेच उशिरा रात्रीपर्यंत सुरू असलेल्या बेकायदेशीर गोदामांमधील मालाच्या लोडिंग-अनलोडिंगच्या आवाजामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. रात्री २ ते ३ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कामांमुळे नागरिकांच्या झोपेवर आणि शांततेवर परिणाम होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.

या समस्येबाबत स्थानिक नागरिक तसेच हनीलिसा अपार्टमेंटमधील रहिवाशांनी स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाकडे निवेदन व अर्ज सादर केला आहे. रहिवाशांची झोप, शांतता आणि आरोग्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसून, संबंधित अधिकाऱ्यांनी परिसराची तातडीने पाहणी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…