अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : शहरातील सावेडी भागातील रावसाहेब पटवर्धन सभागृह येथे रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत गायन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. अनिता उर्फ सरोजनिबेन अशोक गांधी यांच्या स्मरणार्थ ‘स्मृतिंगंध संगीत मंच’च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
अहिल्यानगर शहरातील प्रसिद्ध गायिका सु. श्री. संपदा सुरेश चौधरी यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना संवादिनीवर श्री. मकरंद खरवंडीकर, तबल्यावर श्री. महेंद्र पळसकर आणि तालवाद्यावर श्री. कुलदीप चव्हाण साथ करणार आहेत. निवेदन डॉ. संगीता कुलकर्णी करणार असून ज्ञानसरस्वती संगीत निकेतनचे विद्यार्थी सहगायक म्हणून सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिकांनी या संगीत मैफिलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्मृतिंगंध संगीत मंचाचे श्री. अशोक गांधी जरीवाला यांनी केले आहे.


