सोनं खरेदीची सुवर्णसंधी! दरात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोनं तब्बल ₹4,000 ने स्वस्त

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या किमतींमुळे ग्राहकांची चिंता वाढली होती. मात्र आठवड्याच्या सुरुवातीलाच सराफा बाजारातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात आज तब्बल ₹4,000 ची घसरण झाल्याने खरेदीदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लग्नसराई, सण-उत्सव किंवा गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.
शनिवारी सोन्याच्या किमतीत मोठी घट झाल्यानंतर आज पुन्हा दर खाली आले आहेत. त्यामुळे सोनं खरेदीसाठी ग्राहकांची पावलं पुन्हा सराफा बाजाराकडे वळण्याची शक्यता आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर ₹1,46,510 वर पोहोचला असून, 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,34,300 इतका आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव ₹1,09,880 इतका नोंदवण्यात आला आहे.विशेष म्हणजे मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये सोन्याचे दर समान आहेत. दिल्लीत मात्र हे दर तुलनेने किंचित जास्त असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, चांदीच्या किमती आज स्थिर राहिल्या आहेत. 10 ग्रॅम चांदीचा दर ₹2,500 असून 1 किलो चांदीसाठी ग्राहकांना ₹2.50 लाख मोजावे लागत आहेत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि गुंतवणूकदारांचा कल लक्षात घेता येत्या काही दिवसांत सोन्यासोबतच चांदीच्या दरातही आणखी काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सोन्याच्या दरातील ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत असली, तरी खरेदीपूर्वी स्थानिक सराफा बाजारातील ताजे दर तपासूनच व्यवहार करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…