सायबर ठगीची नवी शक्कल! निर्मला सीतारामन यांचा फोटो वापरून महिलेची 43 लाखांची फसवणूक

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे छायाचित्र वापरून तयार करण्यात आलेल्या फसव्या ऑनलाइन जाहिरातीला भुलून एका 59 वर्षीय महिलेची तब्बल 43 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पूर्व विभाग सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला एका खासगी शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यात फेसबुक पाहत असताना त्यांना निर्मला सीतारामन यांचे छायाचित्र असलेली एक जाहिरात दिसली. अवघ्या 22 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून लाखो रुपयांचा नफा मिळू शकतो, असा दावा या जाहिरातीत करण्यात आला होता.
जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर संबंधित महिलेसमोर परकीय चलन व्यवहारांबाबत माहिती देणारे वेबपेज उघडले. त्यावर नोंदणी केल्यानंतर ‘पांड्या’ नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. परकीय चलनाची खरेदी-विक्री कधी करावी याबाबत मार्गदर्शन करत त्याने सुरुवातीला 200 अमेरिकन डॉलर गुंतवण्यास सांगितले. या व्यवहारातून 20 डॉलरचा नफा मिळाल्याने महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला.
यानंतर अधिक नफ्याच्या आमिषाने महिलेने टप्प्याटप्प्याने तब्बल 48 लाख रुपये गुंतवले. मात्र, नफ्याची रक्कम खात्यात जमा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विविध कारणे देत टाळाटाळ करण्यात आली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.प्राथमिक तपासात महिलेचे सुमारे 43 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले असून, सायबर पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…