सरहद संस्थेच्या वतीने स्व. नाना पाटेकर यांच्या नावाने काश्मीरमध्ये शाळा सुरू करणार

मयुर मसूरकर व राजू फरांदे यांची माहिती

पुणे ,आशिष ओढेकर (प्रमुख पश्चिम महाराष्ट्र) : आपल्या अभिनयाने जगभरातील रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या नाना पाटेकर यांचे काश्मीरवर विशेष प्रेम होते. काश्मीरमधील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काम करण्याचा मानस व्यक्त करून त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू केले होते. आमची म्हणजेच मयुर मसूरकर तसेच राजू फरांदे यांची मल्हार पाटेकर आणि नाना यांच्याशी प्रत्यक्ष भेट होऊन यासंदर्भात चर्चाही झाली होती.

त्यांच्या अकाली जाण्यानंतर मल्हार तसेच त्यांचे सहकारी हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील, याची आम्हाला खात्री आहे. मात्र, सरहद संस्थेनेही नाना पाटेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या नावाने शाळा सुरू करण्याचा संकल्प केला आहे. सरहद संस्था काश्मीरमध्ये गेली चार दशकांहून अधिक काळ काम करते. संस्थेच्या वतीने दर्दपोरा, जि. कुपवाडा आणि आरागाम, जि. बांदीपोरा येथे दोन शाळा चालविल्या जातात. सरहद संस्थेचे समन्वयक जाहीद भट व सलीम रैना यांनी काश्मीरमध्ये स्व. नाना पाटेकर यांच्या नावाने शाळा सुरू करण्यासाठी स्वतःची जागा देऊन पुढाकार घेण्याचे ठरविले आहे.

मल्हार पाटेकर तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी यास मान्यता दिल्यास स्व. नाना पाटेकर यांच्या नावाने काश्मीरमध्ये शाळा सुरू करण्यात येईल आणि ही स्व. नाना पाटेकर यांना खरी आदरांजली ठरेल, अशी माहिती संस्थेचे मयुर मसूरकर आणि राजू फरांदे यांनी आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…