सरस्वती विद्यालयात हरित ऊर्जा व विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती

नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : अभियंता दिनानिमित्त शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयात हरित ऊर्जा, विद्युत सुरक्षा आणि वीज बचतीबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून लोकसहभागातून साजरा करण्याच्या उपक्रमाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना हरित ऊर्जा, विद्युत सुरक्षा आणि वीज संवर्धन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री. प्रशांत काकडे, सहाय्यक अभियंता श्री. प्रशांत शिंदे, प्रधान ऑपरेटर श्री. श्रीकांत तसेच महावितरणच्या इतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी संसाधन व्यक्तींनी अक्षय ऊर्जेचे महत्त्व, विद्युत उपकरणांचा वापर करताना घ्यावयाची आवश्यक काळजी तसेच दैनंदिन जीवनात वीज बचत करण्याच्या सोप्या उपायांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सुरक्षित, जबाबदार आणि ऊर्जाबचत करणाऱ्या सवयी अंगीकाराव्यात, यासाठी कार्यक्रमातून प्रबोधन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. रेश्मी उमेश, उपमुख्याध्यापिका सौ. शै‍ली अय्यर तसेच पर्यवेक्षक श्री. राहुल घोडे आणि श्री. शैलेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली जगताप यांनी केले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

महाराष्ट्रात FDAची धडक कारवाई; 12 लाखांचा गुटखा जप्त, 14 होटल-रेस्तरां के लाइसेंस निलंबित

त्योहारों का मौसम शुरू होते ही खाद्य पदार्थों की गुणवत्ता और स्वच्छता को लेकर महाराष्ट्र के खाद्य एवं औषधि प्रशासन (FDA) ने सख्त अभियान शुरू किया है। FDA आयुक्त तुकाराम…

गणरायाच्या साक्षीने बच्चू कडूंचा सरकारला थेट सवाल!

अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी) : यंदाच्या गणेशोत्सवात केवळ भक्तीच नव्हे, तर समाजातील ज्वलंत प्रश्नांनाही वाचा फोडण्याचा प्रयत्न आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. कुरळपूर्णा येथील त्यांच्या निवासस्थानी साकारण्यात आलेला…