सरस्वती विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयात शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या समर्पणाचा, सेवाभावाचा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. त्यानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. रेश्मी उमेश यांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या शिकवणीचा आणि व्यक्तिमत्त्वावर झालेल्या दीर्घकालीन प्रभावाचा उल्लेख केला. दक्षिण भारतीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. डॉ. आर. एस. सुंदरम यांनी यावेळी मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्त्व विकास आणि ज्ञानवृद्धीसाठी वाचनाची सवय महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. सातत्यपूर्ण वाचनामुळे शिक्षकांचा दृष्टिकोन व्यापक होतो आणि त्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी उत्कृष्ट कार्याबद्दल सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. पूर्व-प्राथमिक विभागासाठी सौ. पायल दाणी, प्राथमिक विभागासाठी सौ. सीमा गोडबोले आणि माध्यमिक विभागासाठी श्री. निलेश धवड यांना त्यांच्या प्रामाणिक सेवा, समर्पण आणि शिक्षणाप्रती असलेल्या निष्ठेबद्दल सन्मानित करण्यात आले. शिक्षकांसाठी विविध मनोरंजक खेळ व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्याध्यापिका शैली अय्यर, पर्यवेक्षक  राहुल घोडे व  शैलेंद्र ठाकूर तसेच पूर्व-प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका  वीणा नारायणन यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम घेण्यात आले.

विद्यालयात यावेळी स्वशासन दिनाचेही आयोजन करण्यात आले. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी शिक्षकांची भूमिका स्वीकारली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या जबाबदाऱ्या आणि अध्यापन क्षेत्रातील आव्हाने प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. यावेळी उपाध्यक्ष ॲड. डॉ. आर. एस. सुंदरम, सचिव  व्ही. मीनाक्षी, सहसचिव डॉ. सुरेश चारी, सहखजिनदार टी. जी. कुमार तसेच आर. कुमार,  एस. कृष्णकुमार, जे. राधाकृष्णन,  प्रकाश मुदलियार,  आर. सी. कृष्ण कुमार आणि श्रीनिवास व्ही. अय्यर यांनी शिक्षकांचा सत्कार केला. अध्यक्ष  टी. के. व्यंकटेश, खजिनदारआर. गणेश,व्ही. दुरैराजन आणि समन्वयक प्रभूरामन यांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचा समारोप कविता चोपडे यांच्या आभारप्रदर्शनाने झाला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…