जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

चिंचोलकर नियंत्रण कक्षात, तर जाधव नांदेड ग्रामीणला

नांदेड, रविंद्र औंढेकर (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने जारी केलेल्या आदेशांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नांदेड ग्रामीणचे ‘दबंग’ समजले जाणारे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, त्यांच्या रिक्त जागेवर नियंत्रण कक्षातील अशोक जाधव यांना पाठवण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयातून मंगळवारी आदेश काढण्यात आले. त्यात संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक सुभाष उन्हाळे यांची विमानतळ सुरक्षा येथून पोलीस ठाणे नायगाव येथे पदस्थापना करण्यात आली आहे. नायगावचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना अर्धापूर येथे पाठवण्यात आले असून, अर्धापूरचे पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांची विमानतळ सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या सर्व निरीक्षकांनी नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी पदभार स्वीकारून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…