लाडक्या बहिणींच्या हप्त्याची प्रतीक्षा कायम; जूनचे १५०० रुपये कधी येणार?

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. जून महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही अद्याप १५०० रुपयांचा हप्ता खात्यात जमा झालेला नसल्याने अनेक महिला सरकारकडे डोळे लावून बसल्या आहेत. त्यामुळे जूनचा हप्ता नेमका कधी मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याचा हप्ता २८ ते ३० जूनदरम्यान लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. काही कारणास्तव निधी वितरणास विलंब झाल्यास जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही हा हप्ता जमा होऊ शकतो. यापूर्वीही अनेकदा महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला निधी वितरित करण्यात आला आहे.यापूर्वी मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे वितरित करण्यात आले होते. त्यानंतर मे महिन्याचा हप्ता १६ जून रोजी लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आला. त्यामुळे जून महिन्याच्या हप्त्यासाठीही महिलांना काही काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र, निधी लवकरच खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, योजनेच्या निधीबाबत सरकारने काही नियम अधिक कडक केले आहेत. लाभार्थींचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. खाते आधारशी जोडलेले नसल्यास हप्ता जमा होण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्याची माहिती तपासून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.तसेच, ई-केवायसी प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली असून अपात्र अर्ज वगळण्यात आले आहेत. त्यामुळे आता केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील सुमारे १ कोटी ७० लाख महिला सध्या या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…