पुणे फेस्टिव्हलचा पुरस्कार हा जणू माहेरवाशिणीचा गौरव!

नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर यांचे उद्गार; नृत्यझंकार स्पर्धेत नृत्यगुरू पुरस्कार प्रदान

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : पुणे फेस्टिव्हलच्या सुरुवातीपासून मी या महोत्सवाचा भाग आहे. उद्घाटनापासून ते एकल सादरीकरणापर्यंत मी या महोत्सवात नृत्यसेवा केली आहे. त्यामुळे मी स्वतःला पुणे फेस्टिव्हल कुटुंबाचा एक घटक मानते. मला दिलेला पुरस्कार मी माहेरवाशिणीचा गौरव म्हणून विनम्रतेने स्वीकारते, असे उद्गार प्रसिद्ध नृत्यगुरू व नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर यांनी शनिवारी येथे काढले.

पुणे फेस्टिव्हलतर्फे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली ‘नृत्यझंकार’ नृत्य स्पर्धा शनिवारी बालगंधर्व रंगमंदिरात पार पडली. यावेळी ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना व नृत्यगुरू डॉ. स्वाती दैठणकर यांना पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते ‘पुणे फेस्टिव्हल नृत्यगुरू पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, उपरणे आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलच्या चेअरपर्सन मीरा सुरेश कलमाडी, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, विश्वस्त मोहन टिल्लू, माजी आमदार दीप्ती चौधरी, नगरसेवक सुनील शिंदे, स्पर्धा संयोजक संयोगिता कुदळे तसेच प्रमुख पाहुण्या पोलिस निरीक्षक शीतल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. दैठणकर म्हणाल्या, माझे कलाशिक्षण मुंबईत झाले; मात्र लग्नानंतर मी पुण्यात आले आणि आमचे संपूर्ण कुटुंबच पुणे फेस्टिव्हलचा एक भाग झाले. कलाकार म्हणून पुण्याने मला स्वीकारले. गुरु-शिष्य परंपरा ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. संस्कृतीचा आणि कलेचा प्रवाह या परंपरेमुळे अखंडित राहतो. गुरूंनी दिलेली कला जपून, त्यात भर घालण्याचा प्रयत्न करत ती पुढील पिढीकडे सुपूर्द करणे, ही कलाकाराची जबाबदारी असते. ही जबाबदारी स्वीकारून, यथाशक्ती एका व्रताप्रमाणे ती पुढील पिढीकडे सोपविण्याचा प्रयत्न करत आहे. याच भावनेने हा पुरस्कार स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णकुमार गोयल म्हणाले, पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपण्याचे कार्य केले जात आहे. हीच महोत्सवाची ओळख असून, स्वाती दैठणकर ही ओळख जपण्याचे आणि पुढे नेण्याचे कार्य करीत आहेत.

यावेळी नृत्यस्पर्धेच्या परीक्षक पूजा वाघ, डॉ. जतीन पांडे आणि आकृती शृंगारे यांचाही कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. रत्ना दहीवेलकर यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर नृत्यस्पर्धेतील सादरीकरणांना सुरुवात झाली. पुणे फेस्टिव्हलच्या ‘नृत्यझंकार’ स्पर्धेत एकल आणि समूह नृत्य अशा दोन प्रकारांचा समावेश होता. एकल नृत्य स्पर्धा २० ते ३५ आणि ३६ ते ५० वर्षे अशा दोन वयोगटांत घेण्यात आली. समूह नृत्य स्पर्धेसाठी २० ते ५५ वर्षे हा वयोगट निश्चित करण्यात आला होता. प्रत्येक समूहात पाच ते आठ महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत बॉलीवूड, लावणी, कथ्थक आणि फ्युजन अशा विविध नृत्यप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले.

नृत्य स्पर्धेचा निकाल

एकल नृत्य स्पर्धा : वयोगट २० ते ३५ वर्षे

प्रथम : स्नेहल साधू

द्वितीय : तनुजा गोडे

एकल नृत्य स्पर्धा : वयोगट ३६ ते ५० वर्षे

प्रथम : श्वेता जाधव

द्वितीय : पल्लवी लोंढे

तृतीय : स्नेहल राक्षे

समूह नृत्य स्पर्धा

प्रथम : भावना’ज डान्स ग्रुप

द्वितीय : माय डान्स अकॅडमी

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…