राज्यस्तरीय सायकल पोलो निवड चाचणीसाठी नागपुरात पालक-खेळाडू बैठक

राष्ट्रीय स्पर्धेसाठी सक्षम महाराष्ट्र संघ तयार करण्याचा निर्धार; ३० सप्टेंबरला निवड चाचणी

नागपूर, मोहन जाधव ( प्रतिनिधि ) : नागपूर जिल्हा सायकल पोलो असोसिएशनच्या वतीने आगामी राज्यस्तरीय निवड चाचणी तसेच राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीच्या अनुषंगाने पालक, खेळाडू, प्रशिक्षक व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत ३० सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय निवड चाचणीचे नियोजन, खेळाडूंची तयारी तसेच पालक व खेळाडूंच्या अडचणी आणि समस्यांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीस महा सायकल पोलो असोसिएशनचे सचिव संजय तिजारे, आंतरराष्ट्रीय सायकल पोलो खेळाडू श्रीकांत साखरकर, प्रशिक्षक मोहित खोब्रागडे, पदाधिकारी महेंद्रजी कावडे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना नागपूर जिल्हा सायकल पोलो असोसिएशनचे सचिव उत्तम इटनकर यांनी केली. आगामी निवड चाचणीचे महत्त्व स्पष्ट करून सर्व पात्र खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

भारतीय सायकल पोलो महासंघाच्या मार्गदर्शनाखाली ही राज्यस्तरीय निवड चाचणी होणार असून, चन्नावार सर, आंतरराष्ट्रीय सायकल पोलो खेळाडू मिलिंद पटले आणि राष्ट्रीय खेळाडू चंद्रकांत तिजारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडणार आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा सक्षम संघ तयार करण्याच्या दृष्टीने खेळाडूंनी शिस्त, मेहनत आणि पूर्ण तयारीनिशी निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. खेळाडूंच्या प्रगतीसाठी पालक, प्रशिक्षक आणि संघटनेचा समन्वय महत्त्वाचा असून, सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून सायकल पोलो खेळाला नवी उंची देऊया, असे उत्तम इटनकर यांनी सांगितले. बैठकीच्या शेवटी त्यांनी उपस्थित पालक, खेळाडू, प्रशिक्षक व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…