यशोमती ठाकूर मैदानात, अदितीताई पोहरे यांच्या प्रचाराला वेग!

पायाला भिंगरी लावून पाचही जिल्ह्यांत दौरे; शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत थेट संवाद

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रा. अदितीताई ऋषिकेश पोहरे यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे त्या विभागातील पाचही जिल्ह्यांत दौरे करीत शाळा-महाविद्यालयांतील शिक्षक आणि प्राध्यापकांशी थेट संवाद साधत आहेत. शिक्षकांचे प्रश्न जाणून घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विश्वास देणे, यावर त्यांच्या प्रचारदौऱ्यात भर दिला जात आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळीत केवळ मतांचा हिशेब न मांडता शिक्षकांच्या प्रश्नांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या दौऱ्यांतून केला जात आहे. जुनी पेन्शन योजना, प्रलंबित सेवाविषयक मागण्या, शिक्षकांचे हक्क, आर्थिक सुरक्षितता आणि शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी या मुद्द्यांवर शिक्षकांशी चर्चा केली जात आहे. शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा विश्वास यशोमती ठाकूर व्यक्त करीत आहेत.

शिक्षकांचे प्रश्न केंद्रस्थानी; अदितीताईंचा अनुभव अधोरेखित

काँग्रेसच्या उमेदवार प्रा. अदितीताई पोहरे या स्वतः शिक्षिका असल्याने शिक्षकांच्या सेवेशी संबंधित प्रश्नांची आपल्याला प्रत्यक्ष जाणीव असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. जुनी पेन्शन हा केवळ आर्थिक विषय नसून सेवेनंतरच्या सन्मानाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न असल्याचे त्या सांगत आहेत. यशोमती ठाकूर यांचे विभागातील विविध जिल्ह्यांतील दौरे आणि अदितीताई पोहरे यांचा शिक्षकांशी थेट संवाद यामुळे काँग्रेसच्या प्रचारात शिक्षकांच्या प्रश्नांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. आता या प्रश्नांवर उमेदवारांकडून मांडल्या जाणाऱ्या भूमिका, आश्वासने आणि प्रत्यक्ष पाठपुरावा याकडे शिक्षक मतदारांचे लक्ष लागले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…