वडेपुरी : नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यादवकालीन वडेपुरी, ता. लोहा येथील डोंगराच्या कुशीत वसलेल्या माता रत्नेश्वरी देवीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची विधिवत पूजा-अर्चा करून आशीर्वाद घेतले. परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने माता रत्नेश्वरी देवीच्या चरणी नतमस्तक होत महाराष्ट्रावरील दुष्काळाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा तसेच राज्यातील सर्व जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदावा, अशी प्रार्थना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली. माता रत्नेश्वरी देवीची कृपा सर्वांवर सदैव राहो, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. वडेपुरी येथील माता रत्नेश्वरी देवी हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून नवरात्रोत्सवात येथे भक्तिमय वातावरण निर्माण होते. देवीच्या दर्शनासाठी विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या दर्शनप्रसंगीही भाविकांची मोठी उपस्थिती होती.
याप्रसंगी माजी उपसभापती आनंदराव पाटील ढाकणीकर, सचिन पाटील चिखलीकर, डॉ. पंजाबराव देशमुख, बळी पाटील जानापुरीकर, सुनील मोरे, चांदोजी दळवे, उत्तमराव राऊत, संतोष पाटील कदम, राजेश मोरे, रंगराव लोंढे, काळेश्वर कदम, गोपाळ सावळे, संजय पा. शिंदे, भाऊराव काळेवाड, बाबुराव सुर्वे, विठ्ठल दळवे, विठ्ठल बोडके, मोहन दळवे, उद्धवराव पवार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.


