मेंढपाळांच्या प्रश्नांना अखेर न्याय? बच्चू कडूंच्या पाठपुराव्याला यश

महसूल मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक; चराई मार्ग, विमा योजना आणि वनहक्क समितीबाबत सकारात्मक संकेत

मेंढपाळ समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर अखेर सकारात्मक हालचाली सुरू झाल्याचे चित्र समोर आले आहे. मेंढपाळ नेते अर्जुन महानर यांच्या सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आमदार बच्चू कडू यांनी मेंढपाळांच्या विविध मागण्या ठामपणे मांडत त्यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

बैठकीत वनहक्क समितीच्या धर्तीवर स्वतंत्र ‘मेंढपाळ वनहक्क समिती’ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच पारंपरिक चराईचे मार्ग पुन्हा खुले करण्यासह प्रत्येक जिल्ह्यात महसूल विभागाच्या ताब्यातील उपलब्ध सरकारी जमिनी चराईसाठी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मेंढपाळांच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत पुढील १५ दिवसांत स्वतंत्र विमा योजना सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले. याशिवाय पशुधनाचे नियमित लसीकरण आणि आरोग्य तपासणी अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

राज्याबाहेरून येणाऱ्या पशुधनाची आरोग्य तपासणी, नोंदणी आणि नियंत्रण व्यवस्था अधिक कडक करण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीनंतर अर्जुन महानर यांच्या उपोषणाची दखल घेतल्याबद्दल तसेच मेंढपाळांच्या प्रश्नांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल समाजातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळेल, अशी अपेक्षा मेंढपाळ समाजाकडून व्यक्त होत आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

हिंदी कोणत्याही भारतीय भाषेची प्रतिस्पर्धी नाही, तर सर्व भाषांची सखी : एकनाथ शिंदे

नवी मुंबई , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : हिंदी ही कोणत्याही भारतीय भाषेची प्रतिस्पर्धी नसून सर्व भारतीय भाषांना जोडणारी सखी आहे. राजभाषेचा प्रसार करताना प्रादेशिक भाषांचा सन्मान आणि गौरव…

सेवानिवृत्तीनंतरही समाजसेवेचा आदर्श; टीम आयुष्मान भारतच्या कार्याचे आ. सतीश चव्हाणांकडून कौतुक

नांदेड, रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ) : सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना आरोग्य सुरक्षा कवच मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या टीम आयुष्मान भारत नांदेडच्या कार्याचे औरंगाबादचे आमदार सतीश चव्हाण यांनी कौतुक…