मुंबईत मोठी दुर्घटना! साकीनाक्यात २५ फूट खोल मॅनहोलमध्ये व्यक्ती पडली; बचाव पथकांची युद्धपातळीवर शोधमोहीम

मुंबई : मुसळधार पावसामुळे आधीच मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असताना साकीनाका परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे २० ते २५ फूट खोल मॅनहोलमध्ये एक अज्ञात व्यक्ती पडल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी यंत्रणांनी युद्धपातळीवर मोहीम सुरू केली आहे.
पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत साकीनाक्यात घडलेल्या या घटनेने सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशामक दल, पोलीस आणि अन्य संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू असले, तरी वृत्त लिहिपर्यंत त्या व्यक्तीचा शोध लागलेला नव्हता.
दरम्यान, आमदार दिलीप लांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र याबाबत अधिकृत यंत्रणांकडून अद्याप कोणतीही अंतिम पुष्टी करण्यात आलेली नाही.काही दिवसांपूर्वी गांधी मार्केट परिसरात पाहणीदरम्यान पालिकेचा एक कर्मचारी मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतरही अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडल्याने पावसाळ्यात उघड्या मॅनहोलच्या सुरक्षिततेबाबत आणि पालिकेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…