भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर शहर ओबीसी युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रांचे वाटप

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( प्रतिनिधी ):  भारतीय जनता पक्षाच्या अहिल्यानगर शहर जिल्हा ओबीसी युवा मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या जिल्हा बैठकीत नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते आणि उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

नवनिर्वाचित ओबीसी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्रीकांत फंड यांच्या नेतृत्वाखाली युवा टीम पक्षाची विचारधारा युवकांमध्ये रुजविण्यासह पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी प्रतीक डहाळे व तुषार आंबेकर, सरचिटणीसपदी वैभव वाघमारे, विजय बेलेकर व संतोष ताठे, तर चिटणीसपदी सुशील थोरात, ओम हजारे, निलेश पालवे व वैभव गदादे यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पक्ष संघटन वाढीसाठी शुभेच्छा दिल्या.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…