पाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे २६-२७ सप्टेंबरला आयोजन

यशदामध्ये चित्रपटांच्या माध्यमातून घडणार पर्यटनाची सफर; ३० हून अधिक लघुपटांचे प्रदर्शन

पुणे, आशिष औंढेकर ( प्रमुख पश्चिम महाराष्ट्र ) : जागतिक पर्यटन दिनानिमित्त परभन्ना फाउंडेशन, महाराष्ट्र पर्यटन विभाग, दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बाणेर येथील यशदा येथे २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय महोत्सव होणार आहे. या महोत्सवात लघुपटांच्या प्रदर्शनासोबतच मुलाखती, परिसंवाद, समूहचर्चा आणि मास्टरक्लास अशी संवादात्मक सत्रे होणार आहेत, अशी माहिती परभन्ना फाउंडेशनचे प्रमुख व महोत्सवाचे प्रमुख संयोजक गणेश चप्पलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महोत्सव सल्लागार समितीचे सदस्य डॉ. राजीव घोडे, जीवराज चोले, एथिकल ट्रॅव्हल प्रोफेशनल असोसिएशनचे (ईटीपीए) अध्यक्ष सुशील पाटील, समन्वय समिती सदस्य पवन घटकांबळे, अजित मांदळे, साहिल भोसले आणि असीम त्रिभुवन, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन पुणेचे (टॅप) अध्यक्ष निलेश भन्साळी, उपाध्यक्ष अमित पंडित, ईटीपीएच्या खजिनदार प्राची खळदकर आदी उपस्थित होते. गणेश चप्पलवार म्हणाले की, चित्रपट उद्योग आणि पर्यटन क्षेत्र यांच्यातील परस्पर संबंध अधिक दृढ करण्याबरोबरच चित्रपटाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, शैक्षणिक क्षेत्र, पर्यटन व्यावसायिक, ट्रॅव्हल क्रिएटर्स आणि व्लॉगर्स यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न या महोत्सवातून केला जाणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे, सांस्कृतिक परंपरा आणि समृद्ध वारसा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम ठरू शकते. त्यामुळे ‘चित्रपटांच्या माध्यमातून पर्यटनाचा प्रचार’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या महोत्सवासाठी लघुपट, माहितीपट, व्लॉग आणि विद्यार्थी चित्रपट अशा विविध विभागांतून प्रवेशिका प्राप्त झाल्या असून, अंतिम निवड झालेले ३० हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. पर्यटनविषयक सर्जनशील कथाकथनाला प्रोत्साहन देणे आणि नवोदित तसेच अनुभवी चित्रपट निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. डॉ. राजीव घोडे यांनी सांगितले की, या महोत्सवाला ज्येष्ठ संपादक संजय आवटे, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचे उपसचिव विजय पोवार, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष सचिन इटकर, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या मुख्य वित्तीय अधिकारी चित्रलेखा खातू तसेच चित्रपट उद्योगातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वैशाली केंदळे, संतोष पठारे आणि अनमोल कोठाडिया यांनी महोत्सवाचे परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.

सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत होणाऱ्या महोत्सवात विविध स्पर्धांमधील पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. सर्वोत्कृष्ट लघुपट, उपविजेता, विशेष परीक्षक उल्लेख आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तसेच माहितीपट आणि व्लॉग विभागातील पुरस्कारांचा यात समावेश आहे. विद्यार्थी विभागात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लघुपट, माहितीपट आणि व्लॉगसाठी पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रवासवर्णन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय महाराष्ट्र पर्यटन आणि वारी पर्यटनासाठी विशेष सन्मान पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर आणि नागपूर येथूनही प्रेक्षक व प्रतिनिधी महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. चित्रपट निर्माते, कलाकार, लेखक, छायाचित्रण दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ, पर्यटन व्यावसायिक आणि पर्यटनप्रेमींसाठी हा महोत्सव महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…