पेट्रोल पंपांवर आजही रांगाच रांगा

राज्यात पुन्हा एकदा पेट्रोल पंपावर नागरिकांनी प्रचंड गर्दी करायला सुरुवात केली आहे. कॅन, ड्रम, बॉटल घेऊन लोक पेट्रोल आणि डिझेल भरायला जात आहेत. काही ठिकाणी तर रात्रीपासूनच लोक रांगा लावून आहेत. अनेक पेट्रोल पंपावर दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत. रणरणत्या उन्हातही लोक पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी रांगेत उभे आहेत. काही ठिकाणी तर 5 ते 6 तासातच इंधन संपत आहे. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर इंधन नाही, पेट्रोल डिझेल संपले… असे बोर्ड लावलेले दिसत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी पेट्रोल आणि डिझेलचा अतिरिक्त साठा न करण्याचं आवाहन करत आहेत. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा परिसरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. कुऱ्हा काकोडा येथील एसआर पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागल्या आहेत. पेट्रोल घेण्यासाठी लोक एक ते अर्ध्या किलोमीटर पर्यंत रांगेत उभे आहेत. कुऱ्हा येथील दुसऱ्या द्वारका किसान पेट्रोल पंपावरही दोन दिवसापासून पेट्रोल नाहीये. दोन दिवसांपासून दोन्ही पेट्रोल पंपावर पेट्रोलची भीषण टंचाई आहे. तर दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी इंधनाचा साठा मुबलक असल्यांनी कोणीही इंधनाची साठवणूक करू नका? आणि अफेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केलं आहे. तरीही लोक त्याकडे दुर्लक्ष करून पेट्रोल पंपांवर रांगा लावताना दिसत आहेत. पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी आलेल्या गर्दीमुळे पाच ते सहा तासातच इंधन पुरवठा संपत असल्याचं समोर येत आहे.
काल मध्यरात्री पुणे ते नागपूर हा महामार्ग ट्रॅक्टर चालक, शेतकऱ्यांनी रोखून धरला होता. तब्बल एका तासानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रॅक्टर चालक आणि शेतकऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनकर्ते ट्रॅक्टर चालक, शेतकरी काल दुपारपासून चिखली जवळील मेहकर फाटा इथल्या पेट्रोल पंपावर आपली वाहन घेऊन रांगेत उभे होते. मात्र ट्रॅक्टर चालकांना डिझेल मिळत नसल्याने ते मध्यरात्री आक्रमक झाले होते. त्यामुळे त्यांनी पुणे ते नागपूर हा महामार्ग मध्यरात्रीच रोखून धरत आक्रमक झाले होते. यावेळी पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेकडो वाहने ट्रॅफिकमध्ये अडकली होती. मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत केली आणि ट्रॅक्टर चालक शेतकऱ्यांची समजूत काढून त्यांना रस्ता रोखण्यास मज्जाव केला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…