पुण्यात भरदिवसा गोळीबाराचा थरार! पोलिस चौकीसमोर तरुणावर ३ गोळ्या, २० मिनिटांत तीन आरोपी जेरबंद

घोरपडे पेठेतील धक्कादायक घटना; पूर्ववैमनस्यातून हल्ल्याचा संशय, जखमी तरुणाची प्रकृती स्थिर

पुणे : पुण्यातील घोरपडे पेठेत शुक्रवारी भरदिवसा पोलिस चौकीसमोरच झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका तरुणावर सलग तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ख्वाजा उद्दीन नाजीर शेख उर्फ नुरु शेख गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोरांनी गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी पाठलाग करून मुख्य आरोपी सुजल सुनील परदेशी याला ताब्यात घेतले. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांत आणखी दोघांना अटक करण्यात आली. या जलद कारवाईमुळे पोलिसांनी गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले. भरदिवसा आणि पोलिस चौकीसमोर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण शोधले जात आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…