अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : धर्म, संस्कृती आणि हिंदू समाजाच्या एकतेसाठी कार्यरत असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विश्व हिंदू परिषदेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
भारतीय संस्कृती, परंपरा आणि हिंदू समाजाच्या हितासाठी विश्व हिंदू परिषद गेल्या अनेक दशकांपासून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत आहे. समाजातील एकोपा, सेवा, संस्कृती आणि धार्मिक परंपरांच्या संवर्धनासाठी परिषदेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे विखे पाटील यांनी शुभेच्छा संदेशात नमूद केले.
समाजातील विविध घटकांना एकत्र आणत सेवा कार्याला प्राधान्य देणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे आणि सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत करणे, ही विश्व हिंदू परिषदेची उल्लेखनीय वाटचाल असल्याचे त्यांनी सांगितले. स्थापना दिनानिमित्त परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुढील सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी शुभेच्छा देत, त्यांच्या कार्याला अधिक व्यापक यश मिळो, अशी सदिच्छा राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.


