नवजात शिशू गमावलेल्या कुटुंबाला नवनित राणा यांची २ लाखांची मदत

बोराळा येथे भेट देत पीडित आईचे सांत्वन; “दुःखाची भरपाई शक्य नाही, पण संकटात कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे ही सामाजिक जबाबदारी”

अमरावती ,राज माहोरे ( प्रतिनिधी ) : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्दैवी घटनेत नवजात शिशू गमावलेल्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनित राणा यांनी चिखलदरा तालुक्यातील बोराळा गावाला भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी मृत नवजात शिशूची आई किरण गंगाराम बेठेकर यांना २ लाख रुपयांचा धनादेश देत आर्थिक मदतीचा हात दिला.

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असताना नवनित राणा यांनी थेट पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बेठेकर कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करत या कठीण प्रसंगी आपण त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास दिला. यावेळी बोलताना नवनित राणा म्हणाल्या, “नवजात बाळ गमावण्याचे दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. या दुःखाची भरपाई कोणतीही आर्थिक मदत करू शकत नाही. मात्र संकटाच्या काळात कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे ही आपली सामाजिक आणि मानवी जबाबदारी आहे.” पीडित आई किरण बेठेकर यांना धीर देत त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. तसेच या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती भूमिका घेण्याची ग्वाही दिली. दुःखाच्या प्रसंगी केवळ आर्थिक मदत नव्हे, तर मानसिक आणि भावनिक आधारही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवनित राणा यांच्या या भेटीमुळे पीडित कुटुंबाला आर्थिक दिलासाबरोबरच भावनिक आधार मिळाल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपत संकटग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश या भेटीतून देण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष रुपाली माथने, भाजपा जिल्हा महामंत्री सुधीर रसे, अतुल वाठ, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तुषार खेरडे, सरपंच अनिता काळे, संजय शनवारे, शरद आठोले, राजेश राऊत, पाटणकर, संजय आसोले, उपेन बछले, रविंद्र गवई, संतोष ठाकूर, आनंद गौर, प्रमोद शनवारे, गजु चव्हाण यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…