पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी गाव व ग्रामीण भाग समजून घ्यावा – माहिती संचालक डॉ. गणेश मुळे

आयआयएमसीच्या विद्यार्थ्यांच्या प्रायोगिक वृत्तपत्राचे डॉ. मुळे यांच्या हस्ते प्रकाशन

अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी)  : पत्रकारितेत बातमी, फिचर, लेख, संपादन आदी बाबी अधिक चांगल्या आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाव व तेथील संस्कृती, समाजकारण अशा सर्व बाबी समजून ग्रामीण भागाचा अभ्यास करावा, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी आज येथे केले.

येथील भारतीय जनसंचार संस्थेत (आयआयएमसी) डॉ. मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. आयआयएमसीचे क्षेत्रीय संचालक डॉ. रोजेश कुशवाह, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, माहिती अधिकारी रितेश भुयार, आयआयएमसीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विनोद निताळे, शैक्षणिक सहशिक्षण सहयोगी जयंत सोनोने आणि रोहण तायडे यावेळी उपस्थित होते.

संचालक डॉ. मुळे म्हणाले, गाव हा देश व विकासाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे गावाचा परिसर, तेथील संस्कृती, समस्या, पर्यावरण त्याला जोडून तेथील समाजकारण आणि राजकारण अशा सर्व बाबी पत्रकारितेचे शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. गाव व ग्रामीण भागाचा चांगला अभ्यास केल्यानंतर तालुका, जिल्हा, राज्य आणि देश समजू शकतो व पत्रकारितेतील बातमी, फिचर, लेख, संपादन आदी विषय समजू शकतात. वाचन, मनन आणि चिंतनाच्या त्रिसूत्रीचे महत्त्वही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. प्रभावी शासकीय जनसंपर्क, त्याची विविध साधने आणि बदलत्या काळातील जनसंपर्क त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी सौदाहरण उत्तरे दिली.

तत्पूर्वी, इंग्रजी पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘द पब्लिक एँगल’ या प्रायोगिक वृत्तपत्राचे डॉ. मुळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. मुळे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर जिल्हा मराठी पत्रकार संघ, श्रमीक पत्रकार संघाला भेट देऊन त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

 

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…