नायगाव विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

नागरिकांनी आपली नावे पडताळून घ्यावीत – बालाजी बच्चेवार

नांदेड, प्रणय डाबरे : नायगाव विधानसभा मतदारसंघातील प्रारूप मतदार यादी सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित मतदान केंद्रांवर तसेच मतदार नोंदणी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात ही यादी नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही, याची नागरिकांनी खात्री करून घ्यावी, असे आवाहन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट नसल्यास नाव नोंदणीसाठी, एखाद्या नावाच्या समावेशास आक्षेप असल्यास किंवा नाव, पत्ता अथवा इतर तपशीलात दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित नागरिकांनी ३० सप्टेंबर २०२६ किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यात दावा अथवा हरकत दाखल करावी. तसेच, १ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारे पात्र नागरिक मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्रमांक ६ द्वारे दावा दाखल करू शकतात. नाव वगळणे किंवा आक्षेप नोंदविण्यासाठी फॉर्म क्रमांक ७, तर मतदार यादीतील तपशीलात दुरुस्तीसाठी फॉर्म क्रमांक ८ वापरता येणार आहे.

दावे व हरकती सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात किंवा संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे दाखल करता येतील. त्यामुळे नायगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी प्रारूप मतदार यादी तपासून आपले नाव, पत्ता व इतर तपशील अचूक असल्याची खात्री करावी, असे आवाहन बालाजी बच्चेवार यांनी केले आहे. मतदार यादीत काही त्रुटी आढळल्यास अथवा नाव समाविष्ट करावयाचे असल्यास विहित मुदतीत आवश्यक दावा किंवा हरकत दाखल करावी, असेही त्यांनी सांगितले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…