अमरावतीतील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा : डॉ. नीलम गोऱ्हे

आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी भक्कम पुरावे सादर करा; छेडछाड आणि धमक्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्याची सूचना

मुंबई, राज माहोरे ( प्रतिनिधी  ) : अमरावती येथे ३ सप्टेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आणि वेदनादायी आहे. एकतर्फी प्रेमातून मुलींना धमकावणे, त्यांचा पाठलाग करणे आणि नकार दिल्यानंतर त्यांची हत्या करणे ही गंभीर सामाजिक विकृती असून, अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

या प्रकरणासंदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्याशी सविस्तर चर्चा करून तपासाची माहिती घेतली. पीडित मुलीला एका परिचित व्यक्तीकडून सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे अमरावतीसह राज्यभरात तीव्र जनक्षोभ निर्माण झाला आहे. केमिकल ॲनालिसिस आणि शवविच्छेदन अहवाल, परिस्थितीजन्य पुरावे, न्यायालयीन जबाब तसेच मोबाइल, सोशल मीडिया आणि इतर डिजिटल पुराव्यांचा सखोल तपास करून दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात दाखल करण्यात यावे. कोणतीही तांत्रिक त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेत आरोपीला फाशीची शिक्षा होईल इतका भक्कम खटला उभा करावा, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्तांना केली.

नसरापूर प्रकरणाच्या धर्तीवर या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि शक्य तितक्या कमी कालावधीत निकाल लागण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. मुलींची छेडछाड करणारे, त्यांचा पाठलाग करणारे अथवा त्यांना प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन माध्यमातून धमकावणारे यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी मुलींमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. अशा तक्रारींची गोपनीय आणि तातडीने दखल घेऊन संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी अमरावती पोलिसांनी विशेष मोहीम हाती घ्यावी, अशी सूचनाही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्त राकेश ओला यांना केली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…