नवीन मोंढा व्यापारी मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरात सभापती सौ. सदिच्छा सोनी-पाटील यांचे रक्तदान

नांदेड,  रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : नांदेड शहरातील नवीन मोंढा व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेशाची भक्तिमय आरती, महाप्रसाद तसेच सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्सवाला सामाजिक उपक्रमाची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला व्यापारी बांधवांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमास नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण तथा शिक्षण समितीच्या सभापती सौ. सदिच्छा वैजू सोनी-पाटील, वैजू सोनी यांच्यासह नवीन मोंढ्यातील अनेक प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते. राठी सेठ, अग्रवाल सेठ यांच्यासह व्यापारी मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेतला. यावेळी प्रभाग क्रमांक ९च्या नगरसेविका तथा सभापती सौ. सदिच्छा सोनी-पाटील यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक संदेश दिला. त्यांच्या रक्तदानामुळे उपस्थित व्यापारी व नागरिकांमध्येही रक्तदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक श्रद्धेबरोबरच समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न नवीन मोंढा व्यापारी मित्र मंडळाने केला. रक्तदान हे गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरू शकते, त्यामुळे अशा उपक्रमांना समाजातील विविध घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

४० वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ६ डिसेंबरला

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : स्वर्गीय सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस समर्पित ४० व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२६ चे आयोजन ६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेतून पर्यावरणीय शाश्वततेला पाठिंबा…

ब्रह्माकुमारी शिवानीदीदींचा १७ नोव्हेंबरला नांदेडमध्ये सत्संग

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : तणावग्रस्त जीवनशैली, वाढती नकारात्मकता आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे खचलेल्या मनांना सकारात्मकतेची नवी दिशा देण्यासाठी जगविख्यात आध्यात्मिक मार्गदर्शिका आणि प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी येत्या १७ नोव्हेंबर रोजी प्रथमच…