दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी विजय राऊत निवडणुकीच्या रिंगणात

अमरावती शहराला पुन्हा देशपातळीवर नेतृत्वाची संधी

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी): अमरावती येथील कॉलेज ऑफ अॅनिमेशन बायोइंजिनिअरींग अँड रिसर्चचे प्राचार्य तथा सुप्रसिद्ध चित्रकार विजय राऊत हे देशातील सर्वात मोठी कलासंस्था असलेल्या दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संकल्प पॅनलच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कला क्षेत्रातील संस्थेच्या कारभारात पारदर्शकता, कलाकारांच्या विकासाला चालना आणि संस्थेच्या आर्थिक व प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा करण्याचा संकल्प पॅनलचा अजेंडा आहे. संस्थेला चांगले दिवस आणण्याचा निर्धार करून आपण ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. विजय राऊत हे या निवडणुकीत विजयी झाल्यास अमरावती शहराला पुन्हा एकदा देशपातळीवर नेतृत्व करण्याची संधी प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१८८८ मध्ये स्थापन झालेल्या ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’चा भारतीय कला क्षेत्रात प्रदीर्घ वारसा आहे. या पार्श्वभूमीवर ३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी निवडणूक संस्थेच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी प्रा. विजय राऊत यांच्यासह ‘संकल्प पॅनल’च्या वतीने गजानन शेपाळ, भावना सोनवणे, विठ्ठलराव बा. लोखंडकार, प्रा. नंदकिशोर मानकर, प्रा. रमेश भोसले, प्रा. संजय साबळे, प्रा. दीपक रमेश पाटील, डॉ. मीनल राजूरकर आणि शिल्पकार अश्विन कदम हे निवडणूक लढवत आहेत.

विजय राऊत यांनी यापूर्वीही द बॉम्बे आर्ट सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली असून, त्यांच्या काळात संस्थेने मोठी प्रगती केली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात संस्थेच्या विकासाला खीळ बसल्याचा आरोप संकल्प पॅनलच्या वतीने करण्यात आला आहे. प्रा. विजय राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे संस्थेच्या विद्यमान कारभाराबाबत विविध प्रश्न उपस्थित करत आर्थिक व्यवहारात पारदर्शकता, नियमित ऑडिट, निधीचा योग्य वापर, कलाकारांना अधिक संधी आणि संस्थेच्या उपक्रमांचा विस्तार यावर भर देण्याची भूमिका मांडली आहे.

संस्थेच्या ऐतिहासिक वारशाला आधुनिक व्यवस्थापनाची जोड देत तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला संस्थेच्या दिशेने विकसित करण्याचा मानस संकल्प पॅनलने व्यक्त केला आहे. येणाऱ्या निवडणुकीत सोसायटीच्या राज्यभरातील सर्व मतदारांनी पॅनलला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन प्रा. विजय राऊत व पॅनलच्या सर्व उमेदवारांनी केले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…