ठाणे-गणपतीपुळे एसटी सेवेने १४ गावांना दिलासा; १४ गावांचा प्रवास सुकर

आमदार संजय केळकरांच्या पाठपुराव्याला यश; कोकण रेल्वेच्या थांब्यांचाही प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता

ठाणे : गणेशोत्सव जवळ आला की ठाणे-मुंबईतील चाकरमान्यांची पावले आपोआप कोकणाकडे वळतात. आपल्या गावच्या गणपतीच्या दर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांना गावापर्यंत पोहोचताना होणारी गैरसोय लक्षात घेता ठाणेकरांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे-गणपतीपुळे एसटी बससेवा ठराविक मार्गाने सुरू करण्यात आली असून, या सेवेचा थेट लाभ सुमारे १४ गावांतील ग्रामस्थ आणि प्रवाशांना होणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात ठाणे आणि मुंबई परिसरातून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. सार्वजनिक वाहतुकीवर या काळात मोठा ताण येत असल्याने अनेकांना गावापर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त प्रवास करावा लागतो. त्यामुळे ठाणे-गणपतीपुळे एसटी बस ठराविक मार्गाने सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार केळकर यांनी एसटी विभागाच्या विभाग नियंत्रकांशी पत्रव्यवहार करून बससेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर अवघ्या आठवडाभरात ठाणे-गणपतीपुळे बससेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे मार्गावरील १४ गावांतील ग्रामस्थांसह गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद समाधानकारक राहिल्यास ही बससेवा केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित न ठेवता वर्षभर सुरू ठेवण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती एसटीच्या विभाग नियंत्रकांनी दिल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.

दादर-सावंतवाडी रेल्वेच्या थांब्यांचीही मागणी

दरम्यान, दादर-सावंतवाडी कोकण रेल्वेच्या छोट्या स्थानकांवरील थांब्यांचा प्रश्नही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. खेडनंतरच्या काही भागांत रेल्वेला थांबा नसल्याने स्थानिक ग्रामस्थ तसेच ठाणे-मुंबईतील चाकरमान्यांची गैरसोय होते. विशेषतः सापे आणि वीर यांसारख्या स्थानकांवर रेल्वेला थांबा मिळाल्यास हजारो प्रवाशांना त्याचा फायदा होऊ शकतो. यासाठीही आमदार संजय केळकर यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. येत्या दोन दिवसांत होणाऱ्या कोकण रेल्वेच्या बैठकीत दादर-सावंतवाडी रेल्वेला आवश्यक थांबे देण्याबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणखी एक दिलासादायक निर्णय होण्याची शक्यता आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…