टीकेच्या वादळानंतर प्रणित मोरेची माफी; जुन्या व्हिडिओंचीही होणार चौकशी.

मुंबई : कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमधील वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर त्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही क्लिप्समुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून आता या प्रकरणाची सायबर पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.
व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देताना प्रणित मोरे यांनी आपल्या वक्तव्यांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याची कबुली दिली. त्यांनी संबंधित सर्वांची माफी मागत भविष्यात अधिक जबाबदारीने आणि सकारात्मक आशयाचा कंटेंट तयार करण्याचे आश्वासन दिले. तसेच कायदेशीर प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही क्लिप्समधील कथित अश्लील आणि आक्षेपार्ह विनोदांमुळे हे प्रकरण चर्चेत आले. या क्लिप्सवरून अनेकांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.राज्याच्या गृह विभागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, प्रणित मोरे यांचे केवळ सध्या चर्चेत असलेले व्हिडिओच नव्हे, तर यापूर्वीचे सर्व अपलोड केलेले कंटेंट आणि व्हिडिओंचीही सायबर पोलिसांकडून तपासणी केली जाईल. तपासादरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण प्रणित मोरे यांना दुसरी संधी देण्याची भूमिका घेत आहेत, तर काहींनी अशा प्रकारच्या कंटेंटवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.प्रणित मोरे यांनी माफी मागितली असली तरी आता सायबर चौकशी आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…