२२ जूनपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; शेतकरी, आरक्षण आणि वाढत्या गुन्हेगारीवर रंगणार जोरदार चर्चा

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा निश्चित झाल्या असून २२ जूनपासून मुंबईत अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. १० जुलैपर्यंत चालणारे हे अधिवेशन तब्बल तीन आठवडे चालणार असून अनेक महत्त्वाच्या आणि जनतेशी निगडित प्रश्नांवर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. विधानसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता, तर विधान परिषदेचे कामकाज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. राज्यपाल विष्णू देव वर्मा यांच्या मान्यतेनंतर यासंदर्भातील अधिसूचना विधिमंडळ सचिवालयाकडून जारी करण्यात आली आहे. राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढती गुन्हेगारी, शेतकरी कर्जमाफी, मान्सूनपूर्व कामांतील त्रुटी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच खत आणि बियाण्यांच्या तुटवड्यासारख्या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची तयारी करत आहेत. याशिवाय नोकऱ्यांमधील समांतर आरक्षण रद्द करण्याच्या हालचाली आणि अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा मुद्दाही अधिवेशनात चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सरकारकडून काही महत्त्वाची विधेयके सादर केली जाणार असल्याची चर्चा असून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारी पक्षही आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

‘शेतकरी जगला तरच देश जगेल’; दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि पिकांच्या हाकेला न्याय मिळवून देण्यासाठी संजय देशमुख यांच्या नेतृत्वात १३ किमी पदयात्रा

 तिवसा, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : शेतकऱ्यांच्या व्यथा, दुष्काळाची झळ, पिकांचे होत असलेले नुकसान आणि प्रशासनाच्या दारात वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मंगळवारी फत्तेपूर (शिवणगाव) ते तिवसा तहसील…

नेवासा येथे उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या प्रशिक्षणाला सुरुवात

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी  (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अंतर्गत आयोजित १० दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या (EDP) प्रशिक्षणाला उत्साहात सुरुवात झाली. नवउद्योजक महिलांना…