छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा! आता १० किलोचे एलपीजी सिलिंडर मिळणार

१९ किलोच्या सिलिंडरचा भार कमी होणार; रेस्टॉरंट, कॅफे आणि स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी नवा पर्याय

मुंबई : व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. सरकारी तेल कंपन्या आता व्यावसायिक वापरासाठी १० किलो वजनाचे हलके एलपीजी सिलिंडर बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मोठे आणि वजनदार सिलिंडर हाताळण्याची अडचण कमी होण्याची शक्यता आहे.

सध्या हॉटेल, रेस्टॉरंट, चहाचे स्टॉल, खाद्यपदार्थ विक्रेते यांसारख्या व्यावसायिकांना प्रामुख्याने १९ किलोचे सिलिंडर वापरावे लागतात. मात्र, अनेक छोट्या व्यावसायिकांसाठी हे सिलिंडर जागेच्या कमतरतेमुळे आणि वजनामुळे त्रासदायक ठरतात. ही समस्या लक्षात घेऊन तेल कंपन्यांकडून १० किलोच्या हलक्या सिलिंडरचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या हे नवीन सिलिंडर आणण्याच्या तयारीत आहेत. हे सिलिंडर हाय-डेन्सिटी पॉलिथिलीन (एचडीपीई) पासून तयार केलेले कंपोझिट सिलिंडर असतील. पारंपरिक स्टीलच्या सिलिंडरच्या तुलनेत हे जवळपास ५० टक्के हलके असतील.

या नवीन सिलिंडरचा फायदा रस्त्यावरील विक्रेते, छोटे कॅफे, खाद्यपदार्थांचे स्टॉल, विद्यार्थी, भाडेकरू आणि कमी जागेत व्यवसाय करणाऱ्या लोकांना होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हलके वजन असल्याने सिलिंडरची वाहतूक आणि वापर अधिक सोपा होणार आहे.कंपोझिट सिलिंडरची आणखी एक खासियत म्हणजे त्याची पारदर्शक रचना. त्यामुळे ग्राहकांना सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे सहज पाहता येणार आहे. यामुळे गॅस संपण्यापूर्वी रिफिलचे नियोजन करणे सोपे होईल.

सध्या व्यावसायिक वापरासाठी १९ किलो, ५ किलो आणि २ किलोचे सिलिंडर उपलब्ध आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत घरगुती सिलिंडरच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना कमी वजनाचा आणि सोयीचा पर्याय मिळाल्यास त्यांच्या दैनंदिन कामातील अडचणी कमी होऊ शकतात. तेल कंपन्यांनी याबाबत अंतिम घोषणा केलेली नसली तरी, १० किलोच्या सिलिंडरच्या प्रस्तावामुळे छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…