चांदीच्या दरात 4500 रुपयांची घसरण, सोने 900 रुपयांनी स्वस्त

मुंबई. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. सराफा बाजारात आज सोने 900 रुपयांनी स्वस्त झाले असून चांदीच्या दरात तब्बल 4,745 रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या दरांनुसार, 23 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 927 रुपयांनी कमी होऊन 1,51,189 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर 2,43,937 रुपये प्रति किलो इतका आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 1,38,489 रुपये प्रति तोळा इतका असून जीएसटीसह हा दर 1,42,643 रुपये इतका होतो. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 695 रुपयांची घट झाली असून तो 1,13,392 रुपये प्रति तोळ्यावर आला आहे. तसेच 23 कॅरेट सोन्याचा दर 923 रुपयांनी घसरून 1,50,584 रुपये झाला आहे. IBJA च्या माहितीनुसार, सोन्याने यापूर्वी 1,76,121 रुपये प्रति तोळा असा उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्या सोनं 24,932 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. चांदीही आपल्या उच्चांकाच्या तुलनेत 1,41,996 रुपयांनी कमी दरात उपलब्ध आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळेही दरांवर परिणाम झाला आहे. अमेरिका आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सोनं 7,908 रुपयांनी तर चांदी 23,963 रुपयांनी स्वस्त झाल्याचे दिसून आले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…