गायकवाडांच्या वक्तव्यावर शिंदे गटाची नाराजी; पक्षाने समर्थनास नकार

मुंबई. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना पक्षाने यापासून स्वतःला दूर ठेवले आहे.पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केले की, गायकवाड यांच्या वक्तव्याशी पक्षाचा कोणताही संबंध नाही. “हे त्यांचे वैयक्तिक मत असून पक्ष त्याचे समर्थन करत नाही,” असे त्यांनी सांगितले. गायकवाड यांच्या भाषेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, संबंधित ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप स्पष्ट नसली तरी, आमदार म्हणून गायकवाड यांनी संयम राखणे अपेक्षित होते, असेही महाजन यांनी नमूद केले. या प्रकरणात पक्षाकडून कारवाई होणार का, यावर त्यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले असून अंतिम निर्णय शिंदे घेतील, असे सांगितले.याआधी माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गायकवाड यांच्या भूमिकेचे अंशतः समर्थन केले होते. मात्र, पक्षाच्या अधिकृत भूमिकेमुळे गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…