पुणे, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ) : महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या आयोगाच्या बैठकीत राज्यासाठी सर्वसमावेशक ‘गोबर पॉलिसी’ निश्चित करण्याकरिता राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आयोगामार्फत ४ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यस्तरीय समितीची अधिकृत स्थापना करण्यात आली.
या समितीची पहिली बैठक १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता गोसेवा आयोगाच्या पुणे कार्यालयात प्रत्यक्ष आणि ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली. बैठकीस महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री. शेखर मुंदडा, समिती अध्यक्ष डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. देवेंद्र जाधव, डॉ. सोमनाथ माने, श्री. मुकेश मोरे, डॉ. अनिल भिकाणे, श्री. सनतकुमार गुप्ता, डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. पंकज हासे, डॉ. राजकुमार पडिले आणि सदस्य सचिव डॉ. शामकांत पाटील उपस्थित होते.
बैठकीत समिती दर १० दिवसांनी बैठक घेणार असल्याचे निश्चित करण्यात आले. तसेच पुढील ५० दिवसांच्या आत ‘गोबर पॉलिसी’, ‘गो-१०’ आणि ‘गोशाळा शक्ती केंद्र’ यांसंदर्भातील अंतिम धोरण व पॉलिसी जाहीर करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.


