कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुसळधार पावसामुळे 33,826 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; नागरिकांना नदीपासून दूर राहण्याचे आवाहन

सातारा :  सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शनिवारी (1 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 6 फूटांपर्यंत उघडण्यात आले. यामुळे कोयना नदीत एकूण 33 हजार 826 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

कोयना सिंचन विभागाच्या माहितीनुसार, सांडव्यावरून 32 हजार 776 क्युसेक्स तर धरणाच्या पायथा विद्युतगृहातून 1 हजार 50 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे कोयना नदीची पाणीपातळी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात किंवा नदीकाठी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

याशिवाय ग्रामपंचायती, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

परतीचा पाऊस न आल्यास कृत्रिम पाऊस पाडण्याची शेतकऱ्यांची मागणी

अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप पिकाची पेरणी झालेली असून कुकडी व घोड प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झालेली आहे. परंतु पावसाची फक्त…

वरदविनायक मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठणास महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

अहिल्यानगर ,राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोतुळ तालुका अकोला येथील प्राचीन व नवसाला पावणाऱ्या श्री वरदविनायक देवस्थानात श्री गणपती बाप्पाच्या आगमना निमित्ताने मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी पहाटे…