राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई; ८ जणांविरुद्ध गुन्हे, चांदी चोरी प्रकरणात चंपत राय यांचा राजीनामा

अयोध्या : राम मंदिरासाठी आलेल्या देणग्यांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई करत आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य सरकारकडे प्राथमिक अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे.
राम मंदिर उभारणीपूर्वीपासून तसेच मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात देणग्या प्राप्त झाल्या होत्या. मात्र, या देणग्यांच्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचे आरोप अनेक दिवसांपासून केले जात होते. या प्रकरणी चौकशीची मागणी वाढत असताना विश्व हिंदू परिषदेनेही चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंदिर न्यासाकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर १३ जून रोजी तीन सदस्यीय एसआयटीची स्थापना केली.
एसआयटीने दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारकडे प्राथमिक अहवाल सादर केला. त्यानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या प्रकरणात रामाशंकर उर्फ टिनू यादव, सुभाष श्रीवास्तव, रामशंकर मिश्रा, करुणेश पांडे, मनीषकुमार यादव, लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा आणि अविनाश शुक्ला यांचा समावेश आहे.
यापैकी टिनू यादव हा ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा माजी चालक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच लवकुश मिश्रा आणि अनुकल्प मिश्रा यांच्याकडे देणगीच्या रकमेची मोजणी करण्याची जबाबदारी होती.दरम्यान, चांदी चोरी प्रकरणात ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…