गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीचे वर्चस्व; १६ जागांवर विजय

कोल्हापूर, राजन शेळके (प्रतिनिधी): मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तीन मंत्री, दोन खासदार आणि दहा आमदार अशा दिग्गज नेत्यांची ताकद एका बाजूला, तर आमदार सतेज पाटील यांची रणनीती दुसऱ्या बाजूला, अशा अटीतटीच्या लढतीत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीने बाजी मारली. आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी आणि गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने १६ जागांवर विजय मिळविला, तर महायुतीला नऊ जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीचा निकाल अखेर समविचारी आघाडीच्या बाजूने लागला.

गोकुळ दूध संघाची निवडणूक केवळ सहकारी संस्थेपुरती मर्यादित राहिली नव्हती. या निवडणुकीत जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदारांच्या राजकीय ताकदीच्या जोरावर महायुतीने विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. ठरावधारकांना आपल्याकडे वळविण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

मात्र, मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये समविचारी आघाडीने घेतलेली आघाडी अखेर विजयात रूपांतरित झाली. महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित ताकद लावूनही समविचारी आघाडीने १६ जागांवर विजय मिळविल्याने कोल्हापूरच्या राजकारणात आमदार सतेज पाटील यांचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. या निकालाचा जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…