आदिवासी कोळी महादेव समाजाचे धरणे आंदोलन १५ दिवसांपासून सुरूच

अनुसूचित जमातींच्या विकासाची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी

नांदेड, रविंद्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी) : महाराष्ट्र अनुसूचित जमाती विकासाची श्वेतपत्रिका जाहीर करण्याच्या मागणीसाठी गुरुवार, दि. २४ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे शांततामय बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी कोळी महादेव समाज मराठवाडा विभागाचे अध्यक्ष नागनाथराव घिसेवाड करत आहेत. या आंदोलनाला १५ दिवस पूर्ण झाले असून, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नायगाव (खै.) तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव समाजबांधव जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे उपस्थित झाले.

महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या विकासासाठी शासनाने केलेली आर्थिक तरतूद, प्रत्यक्ष खर्च, योजना, लाभार्थी आणि त्यांना मिळालेला प्रत्यक्ष लाभ यांची अधिकृत माहिती जनतेसमोर आणावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. तसेच शिक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृह, आश्रमशाळा, रोजगार, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रक्रिया आणि न्यायालयीन निकाल याबाबत पारदर्शक व अधिकृत माहिती उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे. जनगणनेपासून प्रत्यक्ष लाभापर्यंतची अधिकृत आकडेवारी जनतेसमोर आणावी, तसेच अनुसूचित जमातींसाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद आणि प्रत्यक्ष खर्चाची माहिती जाहीर करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनात आदिवासी कोळी महादेव समाज मराठवाडा विभागाचे अध्यक्ष नागनाथराव घिसेवाड, अ‍ॅड. परमेश्वर गोणारे, व्यंकट मुदिराज, आनंदा रेजितवाड, के. एन. जेठेवाड, बालाजी मदेवाड, शाम कोळी धाराशिव, विश्वनाथ चंदलवाड, बाबू जेठेवाड, शंकर कोम्पलवाड, देवराव भंडरवाड, नारायण बोईनवाड, प्रल्हाद जेठेवाड, प्रल्हाद मदेवाड, हणमंत बोईनवाड, देविदास तमनबोईनवाड, बालाजी उलगुलवाड, रमेश जेटेवाड, राजू मदेवाड, दत्ता रेडेवाड, माधव रेडेवाड, शंकर रोडेवाड (सरपंच, बेटक बिलोली), मारोती पिटलेवाड, राम बांचेवाड, विजय भूसेवाड, राजू गादगे, मारोती बिचेवाड, शिवाजी चिंचे आणि त्र्यंबक मदेवाड यांच्यासह नायगाव तालुक्यातील रातोळी, गडगा मांजरमवाडी, होटाळा, नरसी, नायगाव, घुंगराळा, बेटक बिलोली आणि बरबडा येथील कोळी महादेव समाजबांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…