लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! जूनचे 1500 रुपये लवकरच खात्यात?

15 ते 18 जुलैदरम्यान हप्ता जमा होण्याची शक्यता; उशीर झाल्यास मिळू शकतात थेट 3000 रुपये

महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा रखडलेला 1500 रुपयांचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विभागीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 ते 18 जुलैदरम्यान पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते.

जूनचा हप्ता अद्याप मिळाला नसल्याने अनेक महिला चिंतेत होत्या. मात्र आता सरकारकडून निधी वर्ग करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, जर 18 जुलैपर्यंत जून महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत, तर जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचा पर्याय सरकारकडून विचाराधीन असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होऊ शकतात. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातील निर्णयावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र वाढती महागाई लक्षात घेता मानधन वाढवण्याबाबतही चर्चा सुरू आहे. काही अहवालांमध्ये ही रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शासन याबाबत सकारात्मक असल्याचीही माहिती समोर येत आहे.

या योजनेचा लाभ त्याच महिलांना मिळणार आहे ज्यांनी 30 एप्रिलपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि योजनेच्या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत. ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, तसेच सरकारी नोकरी, पेन्शन किंवा आयकर भरणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सध्या राज्यभरातील महिलांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागले आहे – जूनचे 1500 रुपये खात्यात नेमके कधी येणार? पुढील काही दिवसांत याचे स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

खडकवासला धरणसाखळी तुडुंब! पुण्याच्या पाणीटंचाईची चिंता संपली

पुणे :  पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत २६.६६ टीएमसी म्हणजेच ९१.४७ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षासाठी पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची तसेच…

मुंबई लोकल फिर हुई लेट! रेलवे ने यात्रियों को बताया वजह, रोजाना सफर करने वालों में बढ़ा गुस्सा

मुंबई :  मुंबई की लाइफलाइन कही जाने वाली लोकल ट्रेन एक बार फिर चर्चा में है। लगातार देरी से चल रही डहाणू-चर्चगेट (93002) लोकल से परेशान यात्रियों का सब्र अब…