मोशीत भीषण दुर्घटना! कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; दोन मृत, ७ जणांसाठी बचावकार्य सुरू

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये बुधवारी भीषण दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखालून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अद्याप सात जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तळमजल्यासह तीन मजली आरसीसी इमारतीवर अचानक कचऱ्याचा डोंगर कोसळल्याने इमारतीचा काही भाग कोसळला. त्या वेळी इमारतीत कामगार उपस्थित असल्याने एकच गोंधळ उडाला. प्रशासनाच्या माहितीनुसार, आतापर्यंत १४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बचाव पथकांकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतरांचा शोध सुरू असून प्रत्येक क्षण महत्त्वाचा ठरत आहे.
घटनास्थळी अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (PDRF) तसेच देहूरोड येथील सैन्य दलाची मदत घेतली जात आहे. पोकलेन यंत्राच्या साहाय्याने कचऱ्याचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू असले, तरी इमारतीच्या दोन्ही बाजूंना साचलेल्या कचऱ्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. अडकलेल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकाने इमारतीच्या स्लॅबला छिद्र पाडून आत प्रवेश केला.
प्राथमिक माहितीनुसार, कोसळलेल्या इमारतीपासून कचऱ्याचा ढिगारा सुमारे ३० मीटर अंतरावर होता. सलग पडणाऱ्या पावसामुळे हा ढिगारा घसरत इमारतीवर आदळल्याने इमारत एका बाजूला सरकून कोसळली. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता लक्षात घेऊन शोध व बचावकार्य अखंडपणे सुरू आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…