केतन हत्याकांडात धक्कादायक वळण; सिया-चेतनने चार महिन्यांपूर्वीच गुप्तपणे केलं होतं लग्न?

पुणे : लोहगड परिसरातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा धागा लागल्याचा दावा करण्यात येत आहे. मुख्य संशयित सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी सुमारे चार महिन्यांपूर्वीच गुप्तपणे विवाह केल्याची माहिती त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. या नव्या माहितीमुळे हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे.
१८ जून रोजी लोहगडावरून खाली ढकलून केतन अग्रवालची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तपासादरम्यान दोघांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते. त्यातील व्हॉट्सअॅप चॅटची छाननी करताना गुप्त विवाहासंदर्भातील माहिती समोर आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
तपासानुसार, केतन आणि सिया यांचा विवाह ठरला होता. मात्र, सियाचे चेतन चौधरीसोबत प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. या संबंधांबाबतची माहिती लपवण्यासाठी तसेच केतनला मार्गातून दूर करण्याच्या उद्देशाने कट रचण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणा व्यक्त करत आहे. त्यानुसार १८ जून रोजी केतनला फिरायला नेण्याच्या बहाण्याने लोहगडावर नेण्यात आले आणि तेथून खाली ढकलून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना अटक केली. सध्या दोघेही १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असून, व्हॉट्सअॅप चॅटमधून समोर आलेल्या नव्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू ठेवला आहे. या पुराव्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत आरोपींसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मनोहारी मैत्र संघातर्फे मातृभूमी सेवा पुरस्कारांचे वितरण

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : संस्कृती ही समर्पणावर उभी असते. सत्यनिष्ठा आणि सत्याची पूजा हे संस्कृतीचे भूषण आहे. संस्कृतीला सत्याचा आधार नसेल तर ती निरर्थक ठरते. मराठी संस्कृती केवळ सत्यावरच…

परोपकार, सद्वर्तन और ज्ञानातूनच जीवनकल्याण : ह.भ.प. बा.ल. चोथवे महाराज

नांदेड (प्रतिनिधी) :  पापापासून दूर राहणे, पुण्यकर्म करणे आणि निर्मळ वृत्तीच्या सज्जनांची संगत ठेवणे, हीच जीवनकल्याणाची त्रिसूत्री आहे. केवळ धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा प्रवचन श्रवण करून जीवनात परिवर्तन घडत नाही,…