पुण्यात अतिवृष्टीचा कहर; मावळच्या पाटण गावात घरावर दरड कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे बेपत्ता

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी पहाटे दुर्दैवी दुर्घटना घडली. घरावर दरड कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी दोघेजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास अचानक दरड घरावर कोसळल्याने घरातील सदस्य ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, महसूल विभाग आणि पीएमआरडीएचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकालाही पाचारण करण्यात आले.एनडीआरएफच्या पुणे येथील पाचव्या बटालियनचे ३० सदस्यांचे पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन उपकरणांसह पहाटेच घटनास्थळी रवाना झाले. या पथकात एक अधिकारी, दोन वरिष्ठ अधिकारी आणि २७ जवानांचा समावेश असून ते स्थानिक प्रशासनासोबत संयुक्तपणे बचावकार्य करत आहेत.
बचाव मोहिमेदरम्यान आतापर्यंत एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू असून ढिगारा हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…