‘खाशाबा’चा दमदार टीझर प्रदर्शित; नागराज मंजुळे पुन्हा घेऊन येणार प्रेरणादायी कथा

मुंबई : ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ यांसारखे गाजलेले मराठी चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आता ‘खाशाबा’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाचा टीझर गुरुवारी (२ जुलै) प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.
टीझरची सुरुवात मातीतील सराव आणि दोरी फिरवणाऱ्या एका व्यक्तीच्या दृश्याने होते. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व भारतातील वातावरण, ब्रिटिश राजवटीची झलक आणि त्या काळातील सामाजिक परिस्थिती दाखवण्यात आली आहे. अजय-अतुल यांच्या पार्श्वसंगीतामुळे टीझरला अधिक प्रभावी स्वरूप मिळाले आहे.
चित्रपटात नागराज मंजुळे, जितेंद्र जोशी, छाया कदम, ओम भूतकर आणि महेश मांजरेकर यांसारखे कलाकार दिसणार आहेत. मात्र, खाशाबा जाधव यांची भूमिका नेमका कोण साकारणार, याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
‘खाशाबा’ हा चित्रपट १९५२ मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये फ्री-स्टाईल कुस्ती प्रकारात कांस्यपदक जिंकून इतिहास घडवणारे खाशाबा जाधव यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे. स्वतंत्र भारतासाठी वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारे ते पहिले खेळाडू ठरले होते.या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, गर्गी कुलकर्णी आणि नागराज मंजुळे यांनी केली असून, कथा आणि पटकथा नागराज मंजुळे व गर्गी कुलकर्णी यांनी लिहिली आहे. चित्रपट नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

हरे रामा हरे कृष्णाच्या तालावर थिरकले नागपूरकर!

नागपूर : डीजेचा दणदणाट नाही, फिल्मी गाण्यांचा जल्लोष नाही… त्याऐवजी ‘हरे रामा हरे कृष्णा’च्या भक्तिमय गजरात थिरकले नागपूरकर! तिरंगा चौकात विवेकानंद जनजागृती समितीतर्फे आयोजित करण्यात आलेली नागपूर शहरातील पहिली अध्यात्मिक…

मराठवाडा जनविकास संघ व गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण

भंडारा, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : भंडारा डोंगर-जांभवडे, इंदोरी येथे मराठवाडा जनविकास संघ व गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने १ हजार देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कडुलिंब,…