मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात ‘महाआरोग्य शिबिर’; ५ ते १५ जुलैदरम्यान ७५ स्क्रीनिंग कॅम्प

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम नागपूर, दक्षिण-पश्चिम नागपूर आणि दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘महाआरोग्य शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत ५ ते १५ जुलैदरम्यान वॉर्डनिहाय ७५ स्क्रीनिंग कॅम्प घेण्यात येणार असून, तपासणीनंतर शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही माहिती शिबिराचे संयोजक तथा माजी आमदार आणि माजी महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन करतात. त्याच अनुषंगाने गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे संदीप जोशी यांनी सांगितले.महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते तसेच मुख्यमंत्री कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.शिबिरात विविध नामांकित रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टर, शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय तज्ज्ञ सहभागी होणार असून, विविध आजारांचे निदान, उपचार आणि आवश्यकतेनुसार पुढील वैद्यकीय सेवाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या शिबिरात नेत्ररोग, अस्थिरोग, जनरल सर्जरी, हृदयरोग, मेंदूरोग, बालरोग, मूत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, कान-नाक-घसा विकार, स्त्रीरोग, जनरल मेडिसीन, त्वचारोग, मनोविकार, श्वसनविकार, क्षयरोग, कर्करोग, मधुमेह, थायरॉईड तसेच दंतरोग अशा विविध आजारांची तज्ज्ञांकडून मोफत तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर ज्या रुग्णांना उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल, त्यांच्यावर विनामूल्य उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहितीही संदीप जोशी यांनी दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

MPSC Online Exam: विद्यार्थ्यांच्या दबावाला यश? ऑनलाइन परीक्षांबाबत २०२७ पर्यंत थांबण्याचे संकेत

पुणे : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून राज्यभरात निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. विद्यार्थ्यांकडून वाढता विरोध होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू…

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई : ८.३३ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूधभेसळ प्रकरणात गुन्हे दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत मंगळवारी मोठी कारवाई करत ४,३५२ किलो अन्नसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे ८ लाख ३३ हजार ३९१…