देयके रखडल्याचा आरोप; महावितरणच्या कंत्राटदारांचा १ जुलैपासून कामबंदचा इशारा

नागपूर : नागपूर परिमंडळातील महावितरणच्या देखभाल व दुरुस्तीची कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या संघटनेने प्रलंबित देयकांच्या प्रश्नावर अखेर आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेने मुख्य अभियंत्यांना अंतिम निवेदन सादर करत १ जुलै २०२६ पासून ‘वर्क सस्पेन्शन’ म्हणजेच पूर्ण कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, सन २०२४ ते २०२६ या कालावधीत करण्यात आलेल्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांची मोठ्या प्रमाणावरची देयके अद्याप मिळालेली नाहीत. यापूर्वी या विषयावर मुख्य अभियंत्यांसोबत बैठक झाली होती. त्यावेळी लवकरच प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मिळाल्याने नियोजित आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही निधी वितरित न झाल्याने आणि कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे.प्रलंबित देयके तातडीने अदा करावीत, रखडलेल्या परचेस ऑर्डर्स मंजूर कराव्यात तसेच प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि डीटीसी रिप्लेसमेंटच्या निविदांमधील दरविसंगती दूर करून सुधारित दर लागू करावेत, अशा प्रमुख मागण्या कंत्राटदारांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. कामबंद आंदोलनाच्या काळात वीजपुरवठा खंडित होणे, तांत्रिक बिघाड होणे किंवा देखभाल कामांवर परिणाम झाल्यास त्याची कोणतीही वैयक्तिक, तांत्रिक किंवा आर्थिक जबाबदारी कंत्राटदारांची राहणार नसल्याचेही संघटनेने स्पष्ट केले आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…