चंद्रपुरात ६ लाखांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ६ लाख रुपये किमतीचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.
पोलिसांना चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरातील ‘इटनकर पान मंदिर’ जवळ एमडी ड्रग्जची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने सापळा रचून संबंधित ठिकाणी कारवाई केली.कारवाईदरम्यान पोलिसांनी ओम संतोष इटनकर (वय २५) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ६ लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करीच्या साखळीचा तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असून, जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या अनुषंगाने अधिक माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…