47 लाखांच्या बिलासाठी लाचेचा सापळा; मनपाचा अधिकारी एसीबीच्या ताब्यात

अमरावती : अमरावती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. श्वान निर्बिजीकरण व लसीकरण कार्यक्रमाचे 47 लाख रुपयांचे देयक मंजूर करण्यासाठी मोठ्या रकमेची लाच मागितल्याचा आरोप या अधिकाऱ्यावर आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अंतर्गत श्वान नियंत्रण, निर्बिजीकरण आणि लसीकरणाचे काम करणाऱ्या संस्थेने तक्रार दाखल केली होती. संबंधित संस्थेचे काम पूर्ण झाल्यानंतर देयक मंजूर करण्यासाठी सहायक पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांनी 25 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला. तक्रारीनंतर एसीबीने पडताळणी केली असता टप्प्याटप्प्याने लाचेची रक्कम मागितल्याचे समोर आले. सुरुवातीला दोन लाख रुपये घेण्याचे ठरले होते. यापैकी एक लाख रुपये स्वीकारण्यास अधिकाऱ्याने तयारी दर्शविल्याची माहिती तपासात पुढे आली.
एसीबीने यापूर्वीही सापळा रचला होता. मात्र संशय आल्याने संबंधित अधिकारी तेथून निघून गेला होता. त्यानंतरही तपास सुरू ठेवत एसीबीने 16 जून रोजी डिमांड ट्रॅपची कारवाई करून अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, सचिन बोंद्रे यांचे नाव यापूर्वीही लाचखोरीच्या प्रकरणात समोर आले होते. 2021 मध्येही त्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यामुळे पाच वर्षांत दुसऱ्यांदा एसीबीच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याने या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.सध्या एसीबीकडून पुढील तपास सुरू असून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Related Posts

मुंबई-नाशिक महामार्गावर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. आर.सी. पाटील पुलाजवळ घडलेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे…

नंदीग्राम एक्स्प्रेसला LHB कोच; प्रवास होणार अधिक सुरक्षित

विदर्भ/मराठवाडा : विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई-बल्लारशाह-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस (11001/11002) मध्ये आता अत्याधुनिक LHB (लिंक हॉफमन बुश) कोच जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला…